वचन पूर्ण केलं,लोकपाल पारीत होऊ द्या – पंतप्रधान

December 27, 2011 12:28 PM0 commentsViews: 4

27 डिसेंबर

आज संसदेत बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित लोकपाल विधेयकावर चर्चा होतं आहे. विरोधीपक्षांनी सरकारी लोकपालला कडाडून विरोध केला आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपल्या भाषणात आम्ही लोकपाल विधेयकासाठी जे वचन दिले होते ते पूर्ण केलं आहे आणि हे विधेयक जनतेच्या विश्वासावर खरे उतरले, लोकपाल हे संसदेचा सन्मान राखूनच तयार करण्यात आले आहे. कोणतेही विधेयक तयार करणाचा अधिकारही संपूर्णपणे संसदेला आहे. विरोधकांनी ज्याकाही सुचना केल्या आहे त्यांचा आम्ही आदर करतो आणि त्यांचा विचार केला जाईल आज सर्वसामान्य जनतेला भ्रष्टाचार, महागाईमुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे. लोकपाल विधेयक पारीत झाले नाही तर खरंच संसदेने लोकांचा विश्वासघात केल्यासारखे होईल यासाठी सर्वविरोधी पक्षांनी लोकपालचा मार्ग मोकळा करावा असं आवाहन पंतप्रधानांनी केलं.

close