छत्तीसगडमध्ये 20 नोव्हेंबरला शेवटच्या टप्प्यातील मतदान

November 20, 2008 5:22 AM0 commentsViews:

20 नोव्हेंबर, छत्तीसगडछत्तीसगड विधानसभेच्या दुसर्‍या टप्प्याचं मतदान गुरूवारी होत आहे. या टप्प्यात विधानसभेतल्या 90 जागांपैकी उरलेल्या 51 जागांसाठी मतदान होईल. या टप्प्यातले बहुतांशी जिल्हे नक्षलवादी कारवायांनी प्रभावित आहेत. त्यामुळे मतदानासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी आणि त्यांच्या पत्नी रेणू जोगी निवडणुकीच्या मैदानात आहेत. महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या या निवडणुकीसाठी प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत प्रमुख पक्षांचे दिग्गज नेते प्रचार करताना दिसत होते. यामध्ये सोनिया गांधी आणि लालकृष्ण आडवाणी यांचाही समावेश होता. निवडणुकीचा पहिला टप्पा 14 नोव्हेंबरला पार पडला. मतमोजणी 8 डिसेंबरला होणार आहे.

close