अण्णांची प्रकृती ढासळली ; उपोषण सोडण्यास नकार

December 27, 2011 6:59 PM0 commentsViews: 1

27 डिसेंबर

सक्षम लोकपाल विधेयकासाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबईत तीन दिवसीय उपोषणाला सुरुवात केली. मात्र उपोषणाच्या तीन दिवसाअगोदर अण्णांची तब्येत खराब होती. अण्णांना सर्दी, खोकला आणि ताप होता. मात्र उपोषणाचा दिवस येऊन ठेवल्यावर अण्णांची तब्येत ठीक आहे असं सांगत आज उपोषणाला सुरुवात केली. मात्र प्रवासाची दगदग, वातावरणात बदलामुळे अण्णांची प्रकृती आज खालावली. सकाळपासून अण्णांची तब्येत खालवत चालली आहे असं सांगण्यात येतं होतं. याही परिस्थिती अण्णांनी दुपारी भाषण केलं भाषण करताना अण्णांच्या आवाजावरुन अण्णांची तब्येत खराब असल्याचं समजत होतं. तर अण्णांचे सदस्य अरविंद केजरीवाल,किरण बेदी यांनी उपोषण सोडून धरणं धरण्यासाठी विनंती केली होती. मात्र अण्णांनी उपोषण सोडण्यासाठी नकार दिला. आता काही वेळापूर्वी डॉक्टरांच्या टीमकडून अण्णांनी उपोषण सोडावे अशी विनंती केली. अण्णांच्या छातीत इन्फेक्शन झाले आहे. तसेच त्यांना 102 डिग्री इतका ताप सुध्दा आला आहे. मात्र अण्णांनी उपोषण सोडण्यास अजूनही नकार दिला आहे.

close