अनुज बिडवे हत्याप्रकरणी इंग्लंडच्या संसदेनं मागवला अहवाल

December 29, 2011 10:13 AM0 commentsViews: 1

29 डिसेंबर

पुण्यातला विद्यार्थी अनुज बिडवे यांची दोन दिवसांपूर्वी वंशभेदामुळे इंग्लंडमध्ये हत्या करण्यात आली. आज याप्रकरणी इंग्लंडच्या संसदेनं अहवाल मागवला आहे. संसदीय समितीने हा अहवाल मागवलेला आहे. मजूर पक्षाचे खासदार केथ वाझ यांनी या प्रकरणी दुःख आणि तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनूजची सोमवारी सॅलफोर्ट इथं हत्या झाली. या प्रकरणी आतापर्यंत 4 जणांना अटक करण्यात आली आहे.

अनुज बिडवे हा पुणे येथील सिंहगड संस्थेचा विद्यार्थी आहे. तीनच महिन्यापूर्वी अनुज लँकेस्टर विद्यापीठात मायक्रो इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडमध्ये गेला होता. ख्रिसमसच्या रात्री आपल्या मित्रांसोबत पार्टी करत असताना एका टोळक्याने वंशभेदावरुन अनुजला घेरले. अनुजला वेळ विचाराला आणि काही कळायच्या आतच अनुजच्या डोक्यात गोळी घालून हत्या केली. याप्रकरणी सतरा वर्षीय युवकासह चौघांना ताब्यात घेतलं आहे. अनुजच्या मृत्यूची बातमी कळताचं इंग्लंडमध्ये राहणार्‍या भारतीय वंशाच्या लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पण वंशभेदामुळे हत्या झाल्याचे आरोप पोलिसांनी फेटाळले आहेत.

close