भाजपचा खरा चेहरा उघड – सोनिया गांधी

December 28, 2011 8:31 AM0 commentsViews: 3

28 डिसेंबर

काल मंगळवारी बहुचर्चित बहुप्रतीक्षित लोकपाल विधेयक लोकसभेत मंजूर झालं. पण घटना दुरुस्ती विधेयक संमत करण्यात सरकारला अपयश आलं. याचं खापर भाजपवर फोडायला सरकारने सुरुवात केली आहे. लोकपालला घटनात्मक दर्जा देण्याचे भाजपने मान्य केलं होतं पण ऐनवेळी भाजपने पलटी मारली, त्यामुळे भाजपचा खरा चेहरा आता लोकांसमोर आलाय अशी टीका सोनिया गांधींनी भाजपवर केलेली आहे. काल लोकसभेत आवाजी मतदानाने अगोदर लोकपाल विधेयकाला घटनात्मक दर्जा देण्याचे मंजूर करण्यात आले होते मात्र 2/3 बहुमत मिळू न शकल्यामुळे लोकपालला घटनात्मक दर्जा दिला गेला नाही. यावेळी प्रणव मुखर्जी यांनी भाजपवर टीका केली. लोकपालला घटनात्मक दर्जा देण्याचा विरोधकांची इच्छा नाही त्यामुळे आजचा दिवस हा संसदेसाठी अत्यंत वाईट दिवस होता अशा शब्दात प्रणवदांनी आपला संताप व्यक्त केला.

close