मतदानाला गैरहजर काँग्रेस खासदारांवर कारवाईचे संकेत

December 28, 2011 7:42 AM0 commentsViews: 1

28 डिसेंबर

लोकसभेत लोकपाल विधेयकावर काँग्रेसचे काही खासदार गैरहजर होते, त्याची गंभीर दखल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी घेतली आहे. मतदानाच्या वेळी गैरहजर असलेल्या काँग्रेस खासदारांची यादी सोनियांनी मागितली आहे. आणि त्यांच्या गैरहजेरीचं कारण काय हे शोधून काढण्याचे आदेश संदीप दीक्षित आणि गिरीजा व्यास यांना दिले आहे. लोकपालला घटनात्मक दर्जा देण्याची कल्पना काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी मांडली होती. पण, त्यासाठीच्या घटनादुरुस्ती विधेयकावर मतदानावेळी यूपीएचे 16 खासदार गैरहजर राहिले. त्यात केंद्रीय राज्यमंत्री दिनशा पटेल यांच्यासह काँग्रेसचे आणखी 5 खासदार होते. त्यामुळे हे घटनादुरुस्ती विधेयक फेटाळलं गेलं. व्हिप बजावूनसुद्धा काँग्रेसच्या खासदारांनीच तो धुडकावून लावला. यामुळे सोनिया गांधी भयंकर संतापल्यात. आपल्याच खासदारांच्या गैरहजेरीमुळे आपली कल्पना प्रत्यक्षात येऊ शकली नसल्याने राहुल गांधीही संतापल्याचं सूत्रांनी सांगितले आहे. उद्या राज्यसभेतल्या मतदानासाठी सर्व खासदारांनी हजर राहावे असे आदेश सोनिया गांधींनी दिले आहेत.

close