‘इंदू मिलच्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती’

December 29, 2011 1:46 PM0 commentsViews: 19

29 डिसेंबर

इंदू मिलची संपूर्ण जागा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देण्यात यावी मागणी पेटलेलं आंदोलनाला 23 दिवसानंतर तात्पुरते थांबवण्यात आले आहे. बाबासाहेबांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी आज ही घोषणा केली. इंदु मिलच्या जागेच्या मागणीसंदर्भात राज्यसरकार आणि आंदोलकांदरम्यान चर्चा झाली. सरकारच्यावतीने गृहमंत्री आर. आर. पाटील आणि रोहयोमंत्री नितिन राऊत उपस्थित होते.या बैठकीनंतर आनंदराज आंबेडकर यांनी आंदोलन तात्पुरते थांबवत आहोत असं जाहीर केलं पण आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत असंही ठणकावून सांगितलं.

इंदू मिलची संपूर्ण साडेबारा एकर जागा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देण्यात यावी यामागणीसाठी 6 डिसेंबरला आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो भीमसैनिकांनी मिलवर हल्लाबोल केला आणि मिलमध्ये घुसणे कब्जा घेतला. राज्यभरात भीमसैनिकांनी रस्त्यावर उतरुन मिलच्या मागणीसाठी आंदोलनं केली. तर केंद्र सरकारने मिलसाठी 4 एकर जागा देता येईल पण संपूर्ण जागा देण शक्य नाही असं सांगितले या निर्णयाच्या विरोधात 15 डिसेंबर रिपाईचे नेते रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले आणि मिलमध्ये कार्यकर्त्यांनी जाळपोळ आणि तोडफोड केली. मिलची जागा दिली नाहीतर आंदोलन तीव्र करु असा इशाराही आठवलेंनी दिला. हिवाळी अधिवेशनात संपूर्ण जागा देण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ठराव सादर करुन तो मंजूरही केला गेला.

तर दुसरीकडे मिलमध्ये घुसखोरीचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेलं. इथं मात्र न्यायलयाने राज्य सरकारवर कडक ताशेरे ओढले. आंदोलकांवर कारवाई का केली नाही ? कारवाई न करणे म्हणजे गुन्हेगारीला प्रोत्साहन देण्यासारखे आहे असं खडेबोल सुनावले. आंदोलकांवर कारवाई करण्यासाठी न्यायलयाने सरकारला आठ दिवसांची मुदत दिली. त्यानुसार सरकारने पाऊल उचलत आज गृहमंत्री आर.आर.पाटील आणि रोहयोमंत्री नितिन राऊत यांनी थेट आंदोलकांशी चर्चा केली. यात त्यांना यश मिळाले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी तात्पुरते आंदोलन मागे घेत आहे असं जाहीर केले.

close