इंदू मिलची संपूर्ण जागा स्मारकासाठी मिळण्याची शक्यता

December 29, 2011 4:34 PM0 commentsViews: 11

29 डिसेंबर

मुंबईत येथील इंदू मिलची संपूर्ण जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उद्या सर्वपक्षीय शिष्टमंडळासह पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी मिलची सर्वच्या सर्व साडेबारा एकर जमीन विनामुल्य केंद्र सरकारने राज्य सरकारला द्यावी असा ठराव विधिमंडळात एक मताने संमत झाला होता. त्यानुसार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सर्व पक्षीय शिष्टमंडळ घेऊन उद्या दुपारी साडेबारा वाजता पंतप्रधान मनमोहन सिंग यांना दिल्लीत भेटणार आहेत.

आगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूका लक्षात घेता काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांनी इंदु मिलच्या जागेचा प्रश्न प्रतिष्ठेचा बनवला आहे. रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी शिवसेना भाजपशी हातमिळवणी केली असतानाच मुख्यमंत्र्यांनी आपली सर्व ताकद पणाला लावत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या बरोबर समझौता करुन मुख्यमंत्र्यांनी त्यांच मन वळवल आहे.

आता पंतप्रधानांकडून उद्याच्या भेटीत मिलची जागा राज्य सरकारला देण्याचे आश्वासन मिळवण्याचा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे उद्याच्या भेटीत पंतप्रधान मिलच्या जागे बाबत राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांना मिलच्या जागेच आश्वासन देऊ शकतात . अशी शक्यता काँग्रेसच्या नेते व्यक्त करत आहेत.

close