जनतेविरोधात सरकारचं षडयंत्र – केजरीवाल

December 30, 2011 2:31 PM0 commentsViews: 2

30 जानेवारी, नवी दिल्ली

सरकारनं देशाचा विश्वासघात केलाय अशा शब्दात टीम अण्णांनं सरकारविरोधात जोरदार हल्ला चढवला. लोकशाहीविरोधात, देशातल्या जनतेविरोधात सरकारनं षडयंत्र रचल्याचा आरोप टीम अण्णांनी केला आहे. विरोधी पक्षानं काही महत्वाच्या दुरुस्ती सुचवल्या होत्या. या दुरस्त्यांसह येणार बिल एक चांगली सुरुवात होऊ शकली असती असं पहिल्यादाचं टीम अण्णांनी मान्य केलं आहे. मात्र गुरुवारच्या घटनेनं सरकारचा संसदीय लोकशाहीवर विश्वास नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे आता आम्ही आंदोलनाच्या कक्षा वाढवून लोकशाही वाचवण्यासाठी आंदोलन करणार आहोत, असं टीम अण्णांनी जाहीर केलंय.

close