अण्णांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा

January 1, 2012 8:53 AM0 commentsViews:

01 जानेवारी

जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांची तब्येत खालावल्याने त्यांना काल पुण्यातील संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. पण अण्णांच्या तब्येतीत आता झपाट्याने सुधारणा होत असून त्यांनी आज सकाळी नाश्ता केल्याची माहितीही डॉक्टरांनी दिली. अण्णांच्या काही टेस्टही करण्यात आल्या आहेत. आता त्यांना विश्रांतीची गरज असून चिंतेची गरज नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलंय. अण्णांची प्रकृती खालावल्यामुळे टीम अण्णांच्या कोअर कमिटीची बैठकही पुढे ढकलण्यात आलीय. 2 आणि 3 जानेवारीला होणारी बैठक रद्द झाली आहे.

close