यूके पोलिसांचे पथक अनुजच्या कुटुंबीयांची घेणार भेट

January 2, 2012 9:32 AM0 commentsViews: 3

02 जानेवारी

इंग्लंडमध्ये हत्या झालेल्या अनुजच्या आईवडिलांची भेट घेण्यासाठी मॅचेस्टरच्या पोलिसांचे एक पथक थोड्याच वेळात पुण्यात त्याच्या घरी पोहोचणार आहे. चीफ सुपरीटेंडट रस जँक्सन आणि त्याची टीम अनुज बिडवे यांच्या कुंटुबीयाची भेट घेवून, त्यांना तपासातील प्रगतीबद्दल माहिती देणार आहे. अनुजचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी त्याचे आईवडील उद्या (मंगळवारी) मँचेस्टरला रवाना होत आहे. तर अनुजचे मित्र आज मँचेस्टरमध्ये कँडल मार्च काढत आहे. दरम्यान अनुजचं फेसबुक प्रोफाईल ब्लॉक केलं गेलं आहे. त्याचं फेसबुक अकाऊंट पुन्हा ऑपरेट करता यावे यासाठी ब्रिटीश पोलिसांनी मदत करण्याची विनंती त्याच्या कुटुंबीयांनी केली आहे.

close