अखेर जि.प.च्या गोदामाला सील ;पुस्तकांच्या मोजणीचे आदेश

January 1, 2012 11:02 AM0 commentsViews: 2

01 जानेवारी

शालेय विद्यार्थ्यांना वाटपासाठी आणलेल्या जिल्हा परिषदेच्या पुस्तकांना वाळवी लागल्याची घटना उघडकीस आल्यानंतर नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली. आयबीएन-लोकमतच्या बातमीची दखल घेत जि.प.चे सीईओ दिपेंद्रसिंह कुशावाह यांनी गोदामाला सील करून पुस्तकाच्या मोजणीचे आदेश दिले आहे. केवळ अधिकार्‍यांच्या हलगर्जीमुळेच हा प्रकार घडल्याचे आता उघड झालं आहे. दोन लाखांपेक्षा जास्त पुस्तकांची मोजणी झाली आहे. 40 लाखांपेक्षा जास्त किंमत या पुस्तकांची असेल असाही अंदाज व्यक्त करण्यात येतोय. मात्र केवळ देखावा न करता कडक कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली आहे.

close