माजी आमदारानं बुडवले कराचे लाखो रुपये

November 20, 2008 7:34 AM0 commentsViews: 3

20 नोव्हेंबर, उल्हासनगरकिरण सोनावणे उल्हासनगरचे माजी आमदार आणि भाजपचे नेते सितलदास हरचंदानी यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करुन गेल्या 25 वर्षात 60 ते 70 लाख रुपयांचा मालमत्ता कर बुडवला आहे. माहितीच्या अधिकाराखाली हे प्रकरण उजेडात आलं आहे.भाजपचे माजी आमदार सितलदास हरचंदानी 23 वर्षांपासून उल्हासनगरच्या नवजीवन को.ऑपरेटिव्ह बँकेची बँकेचे चेअरमन आहेत. कागदोपत्री ते या जागेचे मालक आहेत.सध्या बँकेचं क्षेत्रफळ सुमारे 15,000 चौ.फू. आहे. पण महापालिकेच्या कागदोपत्री फक्त 7,964 चौ.फू. नोंद असून तेवढ्याच जागेचा कर आकारला जातो.याप्रकरणाला वाचा फोडलीय मुकुंद गुप्ता यांनी.सितलदास यांनी कर चुकवेगिरी केली असली तरी त्यांना हे मान्य नाही.आपण नियमाप्रमाणे भाडे भरत असल्याचा दावा त्यांनी केलाय. त्यांचं म्हणणं आहे की ही महापालिकेची चूक आहे. महापालिकेच्या करअधीक्षकांनी ही महापाललेकेचीच चुक आहे हे कबूल केलं आहे आणि विशेष स्कॉड पाठवून नव्याने मोजणी करून कर आकारु अशी प्रतिक्रीया दिली आहे. गेल्या 25 वर्षांची भरपाई महापालीका करणार असली तरी इतके वर्ष ही चूक का लक्षात आली नाही, या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही.

close