अण्णा एक महिना विश्रांती घ्याच : डॉक्टर

January 2, 2012 9:44 AM0 commentsViews: 10

02 जानेवारी

जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांची तब्येत खालवल्यामुळे दोन दिवसांपूर्वी पुण्यातील संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. अण्णांना 5 दिवस पूर्ण विश्रांतीची गरज असल्याचं अण्णांच्या डॉक्टरांनी सांगितलं आहे. अण्णा अजून 5 दिवस हॉस्पिटलमध्ये राहणारे आहेत. थोड्याच वेळापूर्वी अण्णांचं हेल्थ बुलेटीन घेण्यात आलं. मुंबईत उपोषण करण्याआधीच अण्णा आजारी होते. याही परिस्थिती त्यांनी 2 दिवस उपोषण केले. त्यामुळे अण्णांची प्रकृती ढासळली. आता अण्णांना एक महिना तरी विश्रांती घ्यावीच असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तसेच 2,3 दिवस त्यांना कोणीच भेटू नये,असा सल्लाही डॉक्टरांनी दिला. हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाल्यानंतर अण्णांनी किमान एक महिना विश्रांती घ्यावी असंही डॉक्टरांनी सांगिले. दरम्यान अरविंद केजरीवाल आज अण्णांची भेट घेणार आहेत.

close