बीडमध्ये पार पडला भारुड महोत्सव

January 1, 2012 11:30 AM0 commentsViews: 149

01 जानेवारी

बीडमध्ये नुकताच राष्ट्रीय भारूड महोत्सव मोठ्या थाटात पार पडला. जिल्हाच्या दरडवाडी या छोट्याशा गावात हा महोत्सव झाला. गुलाबी थंडीत गावात चावडीच्या ठिकाणी उभारलेल्या सभामंडपात हा महोत्सव चांगलाच रंगला. ज्येष्ठ भारुडकार माधवराव केंद्रे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं. माधवराव केंद्रे यांनी भारुड राष्ट्रीय पातळीवर नेलं. भारुडातून सामाजिक संदेश आणि मनोरंजन करण्याचे सूत्र त्यांनी ठेवलं. दरडवाडी हे गाव आडबाजूला असूनही वेगळ्या विषयावरच्या या महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला.

close