जे.जे.च्या मेकओव्हरसाठी 680 कोटी मंजूर

January 2, 2012 11:41 AM0 commentsViews: 5

02 जानेवारी

महापालिकेच्या निवडणुका ध्यानात घेऊन राज्य सरकारने आज घोषणांचा पाऊस पाडला. 1995 पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याचा आणि त्याची विक्री केली तरी त्या नव्या मालकाला त्याची मालकी हक्क देण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. तसेच सध्याच्या जे. जे. हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला पूर्णपणे अद्यावत असं जे. जे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्यात येणार आहे. या 20 मजली अल्ट्रा मॉडर्न हॉस्पिटल उभारणीच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे.

जे.जे ला एम्सचा दर्जा देण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण खात्याकडून एकूण 680 कोटींचा हा तयार करण्यात आला आहे. शिवाय मंत्रिमंडळाने राज्यात चार नव्या सरकारी मेडिकल कॉलेजेसना मंजुरी दिली आहे. मुंबई, अलिबाग, नंदूरबार आणि सातार्‍यात ही हॉस्पिटल्स उभारले जाणार आहेत. मुंबईतलं हे कॉलेज सेंट जॉर्ज, जीटी रुग्णालयाशी संलग्न असणार आहे. तसेच वैद्यकीय महाविद्यालय सेंट जॉर्ज आणि जी टी हॉस्पिटलसोबत संलग्न असेल. अल्पसंख्याक महिलांसाठी 1600 बचतगटांना परवानगी देण्यात आलीय. तर गरिबांना छोट्या आणि मोठ्या शहरांमध्ये स्वस्त घरांसाठी जागा राखीव ठेवण्यात येणार आहे.जे.जे.हॉस्पिटलचा नवा आराखडा – बांधकामासाठी 480 कोटी- अत्याधुनिक उपकरणांसाठी 200 कोटी – महापालिकेकडे वाढीव FSI ची करणार मागणी

close