कांद्यासाठी रास्ता रोको केला म्हणून 1 वर्ष सक्त मजुरी

January 2, 2012 6:14 PM0 commentsViews: 6

02 जानेवारी

एकीकडे कांद्याचे भाव कोसळत आहेत तर दुसरीकडे कांद्यासाठी आंदोलन करणार्‍यांना मात्र कायद्याच्या बडग्याला सामोरं जावं लागतं आहे. शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष बबनराव काळे यांना कांद्यासाठी रास्ता रोको केला म्हणून एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. श्रीरामपूर कोर्टाने हा निर्णय दिला आहे. 2006 मध्ये कांद्याचे भाव कोसळत असल्याने काळे यांनी रास्ता रोको केला होता. न्यायालयाचा हा निर्णय बेकायदेशीर असल्याचा दावा काळे यांनी केला. कनिष्ठ कोर्टाने दिलेल्या या निर्णय विरोधात काळेंनी वरिष्ठ कोर्टात दाद मागितली आहे.

close