राज्य बाल नाट्य महोत्सवाकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ

January 2, 2012 12:29 PM0 commentsViews: 15

02 जानेवारी

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने नागपूरच्या सांयटिफिक सभागृहात 9 व्या महाराष्ट्र राज्य बाल नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. आजपासून सुरु झालेल्या या बालनाट्य महोत्सवाकडे प्रेक्षकांनी मात्र पाठ फिरवली आहे. पहिल्याच दिवशी नाट्याचे दोन प्रयोग होवूनही सभागृह संपूर्ण रिकामं दिसून आलं. त्यामुळे प्रेक्षकांच्या अनुपस्थित नाटक सादर करावं तरी कसं असा प्रश्न नाट्य संघाच्या आयोजकांना पडला आहे. 12 जानेवारी पर्यंत चालणार्‍या या स्पर्धेत 27 नाटकांचे प्रयोग होणार आहे. या स्पर्धेसाठी शहरातील विविध शाळेतील संघ सहभागी झाले आहेत. पण प्रेक्षकांनी अल्प-प्रतिसाद पाहता या बालनाट्य महोत्सवाबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.

close