इंदू मिलच्या निर्णयामुळे भीमसैनिकांचा जल्लोष

January 1, 2012 9:53 AM0 commentsViews: 2

01 जानेवारी

इंदू मिलची संपूर्ण साडेबारा एकरची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी देण्याचे केंद्र सरकारने तत्वता मान्य केलं आहे. त्यामुळे आरपीआय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर जल्लोष साजरा केला आहे. अमरावतीच्या इर्वीन चौकात कार्यकर्त्यांनी ढोल ताशे वाजवून फटाके फोडले. गेली कित्येक वर्षे इंदू मिलच्या जागेचा प्रश्नं रेंगाळत राहिला होता. त्यामुळे नविन वर्षाच्या सुरवातीलाच हा प्रश्नं सुटत चालल्याने आंबेडकरी जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

close