भीमसैनिकांचा जल्लोष, मुंबईत विजयी रॅली

January 2, 2012 12:40 PM0 commentsViews: 8

02 जानेवारी

इंदू मिलची संपूर्ण जागा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देण्यात यावी या मागणीपासून गेल्यामहिन्यात भीमसैनिकांनी मुंबईसह राज्यभरात आंदोलन केली. अखेर नववर्षाची भेट म्हणून राज्य सरकारने मिलची संपूर्ण जागा स्मारकासाठी देण्यासाठी तत्वत:मान्यता दिली. तसेच पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ही मिलची जागा स्मारकासाठी देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आपल्या आंदोलनाचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी आज आरपीआय नेत्यांनी चैत्यभूमी ते इंदू मिल विजयी रॅली काढली. यावेळी येत्या 26 जानेवारीपर्यंत इंदू मिलच्या संदर्भात जर केंद्र सरकारने निर्णय घेतला नाही, तर दिल्लीला धडक देऊ असा इशारा आरपीआय नेते रामदास आठवले यांनी दिला.

close