जे.जे हॉस्पिटलचे होणार मेकओव्हर

January 1, 2012 3:25 PM0 commentsViews: 4

01 जानेवारी

मुंबईतील सुप्रसिध्द जे.जे हॉस्पिटलचे नुतनीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कॅबिनेटच्या उद्या होणार्‍या बैठकीत याबाबत चर्चा होणार आहे. या नवीन आराखड्यानुसार भायखळा येथील जे जे रुग्णालय हे सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं मुख्य सचिवांनी 11 मे ला या रुग्णालयात भेट देऊन पाहणीही केली होती. या रुग्णालयासाठी जवळपास 680 कोटीचा प्रस्तावित खर्च असून,या आराखड्यानुसार जे जे हॉस्पिटल हे 20 मजली होणार आहे. राज्य सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागाला नुतनीकरणासाठीचे आदेश दिले आहे. जे जे हॉस्पिटलच्या या नुतनीकरणानंतर रुग्णासाठी अनेक अत्याधुनिक सुविधा आता नव्याने येणार आहे. या कामाचा आराखडाही तयार करण्यात आला असून नर्सिंग तसेच विद्यार्थी वसतिगृहासाठी अतिरीक्त इमारतही यात बांधली जाणार आहे. या सर्व नुतनिकरण आराखड्यांना जे जे रुग्णालय समूहानंही मान्यता दिली आहे.

close