साध्वीच्या समर्थनार्थ भारतीय विद्यार्थी सेना कोर्टात

November 20, 2008 7:41 AM0 commentsViews: 2

20 नोव्हेंबर, मुंबईमालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी अटकेत असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंगला दिल्या जाणा-या वागणुकीसंदर्भात निवृत्त न्यायाधिशामार्फत चौकशी संदर्भात करावी, अशी मागणी भारतीय विद्यार्थी सेनेच्या सेक्रेटरी शिल्पा देशमुख यांनी केली आहे. यासंदर्भात देशमुख यांनी उच्च न्यायालयात आज याचिका दाखल केली . आरडीएक्स संदर्भात एटीएसनं केलेल्या घूमजावाचीही चौकशी करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचीही मागणी भारतीय विद्यार्थी सेनेनं केली आहे. दरम्यान मालेगाव स्फोटप्रकरणी आरोप ठेवण्यात आलेल्या लष्करी अधिकार्‍यांची चौकशी लष्करानेच करावी अशी मागणी पुण्यातल्या महाराष्ट्र मिल्ट्री फाउंडेशनचे प्रमुख रिटायर्ड कर्नल जयंत चितळे यांनी केली आहे.

close