टीम इंडियाकडून नव्या वर्षाची विजयी भेट ?

January 2, 2012 12:58 PM0 commentsViews: 1

02 जानेवारी

भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान दुसरी टेस्ट उद्यापासून सिडनीत खेळवली जाणार आहेत. मेलबर्न टेस्टमध्ये भारताची भरवशाची बॅटिंग ऑर्डर अपयशी ठरल्यामुळे अर्थातच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण सिडनी टेस्टमध्ये हे अपयश पुसून टाकण्याची संधी टीमला मिळणार आहे. तर दुसरीकडे सिडनी क्रिकेट ग्राऊंड सचिनचं आवडतं मैदान. या मैदानावर सचिननं दोन सेंच्युरी आणि एक डबल सेंच्युरी केली आहे. आता सचिन महाशतक इथेच करणार असे ठोकताळे बांधण्यात येत आहे.

ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर ग्लेन मॅग्रा खेळत असताना भारतीय टीमबरोबर त्याचे मैत्रीचे संबंध होते. पण निवृत्तीनंतर यात थोडा खंड पडला आहे. असंअसलं तरी टीमच्या कामगिरीबद्दल भविष्यवाणी करण्यापासून तो स्वत:ला रोखू शकत नाही. मेलबर्नमध्ये झालेल्या पराभवातून सावरण्याचा प्रयत्न भारतीय टीम करणार आहे. भारताबाहेर सलग पाच टेस्टमध्ये टीमचा पराभव झाला आहे. पण टीम व्यवस्थापन कोणताही बदल करणार नाही अशी शक्यता आहे. त्यामुळे मेलबर्नमध्ये दोन्ही इनिंगमध्ये अपयशी ठरूनही विराट कोहली टीममधली आपली जागा कायम राखण्याची शक्यता आहे. रोहित शर्माला मात्र टीममधल्या समावेशाची वाट पहावी लागणार आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मेलबर्नमध्ये लौकिकास साजेशी कामगिरी केली. पण सचिनचे महाशतक त्याला वाकुल्याच दाखवत आहे. सिडनी क्रिकेट ग्राऊंड सचिनचं आवडतं मैदान…या मैदानावर सचिननं दोन सेंच्युरी आणि एक डबल सेंच्युरी केली आहे. आता सचिन महाशतक इथेच करणार असे ठोकताळे बांधण्यात येत आहे. पण कोणत्याही परिस्थितीत महाशतक पूर्ण होऊ द्यायचं नाही असा चंग कांगारूनं बांधला आहे.

ऑस्ट्रेलियाची बॉलिंग अधिक भक्कम होणार आहे. कारण रायन हॅरिस पूर्णपणे फिट आहे आणि तो सिडनी टेस्टमध्ये खेळणार आहे. पिचसुद्धा बॉलिंग आणि बॅटिंगला सारखीच मदत करेल अशी आशा क्युरेटरला आहे. त्यामुळे दुसरी टेस्ट नक्कीच रंगतदार होईल अशी अपेक्षा व्यक्त होतेय.

close