सुसरी धरणाच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर

January 1, 2012 2:24 PM0 commentsViews: 4

01 जानेवारी

डहाणू तालुक्यातल्या शंकर हंदाव या शेतकर्‍याने सुसरी धरणाला विरोध म्हणून आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेनं संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी या घटनेचा जोरदार निषेध केला. सुसरी धरण होऊ नये यासाठी गेल्या 2 महिन्यांपासून या भागात मोठं आंदोलन सुरू आहे. या धऱणात घरं आणि जमीन जाणार असल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे.आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांशी चर्चा करण्यासाठी आलेल्या पालकमंत्री राजेंद्र गावित यांना यावेळी शेतकर्‍यांनी चांगलंच धारेवर धरलं. येत्या 8 दिवसात या धरणा बाबतीत घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे आश्वासन गावित यांनी शेतकर्‍यांना दिलं. धरण निर्मीतीचा निर्णय रद्द केला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकरी संघटनेनं दिला आहे.

close