बिग बॉसच्या घरात घुसला सुमो पहेलवान

January 2, 2012 1:09 PM0 commentsViews: 10

02 जानेवारी

वादग्रस्त समजल्या जाणार्‍या बिग बॉस सीझन 5 ची रंगत वाढवली त्यातील सेलिब्रिटी स्पर्धकांनी. आता त्यात भर पडतेय ती जपानच्या सुमो रेसलिंग चँपियन यामा याची.. यावेळी सनी लिऑन आणि अँड्र्यू सायमंड या इंटरनॅशनल सेलिब्रिटींनी या सीझनला लोकप्रिय केलं. त्या पाठोपाठ या घरात प्रवेश होतोय जपानच्या सुमो रेसलिंग चॅम्पियन यामा याचा..बिग बॉसच्या अंतिम आठवड्यात घरात प्रवेश करणारा यामा हा सेलिब्रिटी स्पर्धक सहाशे एक पाऊंड इतक्या वजनाचा असून जपानमधला तो सगळ्यात जास्त वजनाचा व्यक्ती आहे. तेव्हा यांच्या उपस्थितीमुळे बिग बॉस घराला किती ग्लॅमर मिळतंय हे लवकरच कळेल.

close