पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन

January 2, 2012 1:30 PM0 commentsViews: 3

02 जानेवारी

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात कर्मचार्‍यांनी आज काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. आमदार विनायक निम्हण यांनी तहसीलदार सचिन गिरी यांना शिवीगाळ केल्याचा आरोप कर्मचार्‍यांनी केला आहे. त्याचाच निषेध करत आज या कर्मचार्‍यांनी आंदोलन केलंय. या आंदोलनात कार्यालयाचे 316 कर्मचारी सहभागी झाले आहे. निम्हण यांनी माफी मागावी अशी मागणी कर्मचार्‍यांनी केली आहे. पण निम्हण यांच्या कार्यकर्त्यांनी कर्मचार्‍यांना मारहाण केली आहे.

close