अंबालात स्कूलबसला भीषण अपघात ; 10 विद्यार्थ्यांचा मृत्यू

January 2, 2012 9:18 AM0 commentsViews: 2

02 जानेवारी

नवीन वर्षाच्या जल्लोषात स्वागत होऊन एक दिवस उलटत नाही तोच आज हरियाणामध्ये अंबाल्यात एका स्कूलबसला अपघात झाला आहे. या अपघातात 10 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे तर 25 मुलं जखमी झाली आहे. नॅशनल हायवे क्र. 1 वर असलेल्या दाट धुक्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतंय. हे सगळे विद्यार्थी 5 ते 8 या वयोगटातील आहेत. अंबालातल्या अर्जुन पब्लिक स्कूलची ही बस होती. पोलिसांनी दिलेल्या माहिती प्रमाणे घटनास्थळी 4 मुलांचा जागीच मृत्यू झाला. जखमी विद्यार्थ्यांना अंबालाच्या केन्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तर काही गंभीर मुलांना चंदिगढ येथील शासकीय रुग्नालयात दाखल करण्यात आलं आहे.

close