सातार्‍यात पाटबंधारे कार्यालयात शेतकरी संघटनेचा राडा

January 2, 2012 1:42 PM0 commentsViews: 1

02 जानेवारी

सातार्‍यात कृष्णा पाटबंधारे कार्यालयात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक झाला. या कार्यालयातील काचा, टेबल खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली आहे. त्यांनी कार्यालयातल्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांनाही मारहाण केली. उरमोडी कॅनलमधून पाणी न सोडल्यामुळे शेतकरी संतप्त झाले. मान आणि खटाव या दुष्काळी भागाला दरवर्षी या कॅनलमधून पाणी दिलं जातं. पण यंदा मागणी करुनही पाणी न सोडल्यानं शेतकरी संतापले आणि पाटबंधारे कार्यालयावर हल्लाबोल केला. दरम्यान पोलिसांनी 20 जणांना ताब्यात घेतले आहे. जवळपास 30 कार्यकर्ते अजूनही या कार्यालयात ठाणं मांडून बसले आहेत. संतापलेल्या शेतकर्‍यांशी कार्यालयातील अधिकार्‍यांनी चर्चा करावी, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

close