अजितदादा पण घेणार उमेदवारांच्या मुलाखती

January 2, 2012 6:10 PM0 commentsViews: 3

02 जानेवारी

येत्या महापालिका निवडणुका लक्षात घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तिकिट देण्यासाठी भावी उमेदवारांची परीक्षा घेतली आणि स्वत: राज यांनी उमेदवारांची मुलाखत सुध्दा घेतली. मनसेच्या या नव्या प्रयोगाला नागरिकांनी मोठ्या मनांने स्वागत केलं आणि कौतुकही केलं. राज यांच्या प्रयोगाची सर्वच राजकीय पक्षांनी अगोदर टीका केली नंतर आपल्याचं उमेदवारांना वळणं देण्यासाठी मेळावे वगैरे भरवले आता खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती स्वत: घेण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक पार्श्वभूमीवर हा निर्णय त्यांनी घेतला आहे. अजितदादाच्या स्पष्ट आणि परखड वक्ता म्हणून ओळख आहे आता राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या मुलाखती कशा होतील याची चर्चेला रंग चढला आहे.

close