पेट्रोल दरवाढ लांबणीवर

January 2, 2012 4:38 PM0 commentsViews: 4

02 जानेवारी

नववर्षात पेट्रोल कंपन्यांनी दरवाढीचा न करण्याचा निर्णय घेऊन सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. त्याचबरोबर पाच राज्यात निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाच राज्यात होणार्‍या विधानसभा निवडणुकीपर्यंत तरी दरवाढ होणार नाही अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरच्या तुलनेत रुपायाची घसरणा झाल्यामुळे पेट्रोल कंपन्यांना कच्च्यातेलाच्या खरेदीत तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे नव वर्षाच्या सुरुवातील पेट्रोलच्या दरात 2 रुपाये 13 पैशांनी वाढ करण्यात येणार अशी शक्यता होती. पण नवं वर्षात पेट्रोल कंपन्यानी आपले दर न वाढवण्याचा सुखद निर्णय घेतला. पण या निर्णयामागे सर्व श्रेय हे निवडणुकांना जाते उत्तरप्रदेशसह इतर पाच राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. त्यात दरवाढ करुन लोकांचा रोष ओढावून घेण्यापेक्षा 15 दिवस दरवाढ टाळणे सरकारला योग्य वाटले. त्यामुळे काही दिवसही असो सर्वसामान्यांना याचा दिलासा मिळाला आहे.

close