मुख्यमंत्र्यांची आणखी एक घोषणा ; धारावीकरांना घरं देणार !

January 3, 2012 3:11 PM0 commentsViews: 3

03 जानेवारी

महापालिकांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापुर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अगदी शेवटच्या क्षणी आणखी दोन निर्णयांची घोषणा केली. मुंबई डीसीआर रुलमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला त्यानुसार मुंबईमध्ये सदनिकांची खरेदी-विक्री अधिक पारदर्शी होणार आहे. त्याचा फायदा सर्वसामान्य ग्राहकांना होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी दुसरा महत्वाचा निर्णय आज जाहीर केला तो म्हणजे धारावी मधल्या सेक्टर पाचच्या पुनर्विकास प्रकल्पामध्ये रहिवाशांना 300 चौरसफुटांची घरं देण्याचा. या घरांची मालकी देखील पती पत्नी दोघांच्या नावे असणार आहे. सेक्टर पाच ला चार इतका एफएसआय देण्यात आला असून म्हाडा मार्फत क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून हा पुनर्विकास केला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी काल आणि आज अनेक निर्णयांचा पाऊस पाडून काँग्रेसने मतदारांना आकर्षित करण्याची मोठी संधी मिळवून दिल्याचा आरोप विरोधकांकडून होतोय.

close