ठाण्यात आघाडीवरुन काँग्रेसमध्येच जुंपली

January 3, 2012 3:24 PM0 commentsViews: 2

03 जानेवारी

ठाणे महापालिका निवडणुकीतील आघाडी करण्यावरुन काँग्रेस मध्येच आता जुंपली आहे. ठाण्यात आघाडी व्हावी अशी काँग्रेसच्या सर्व स्थानिक नेत्याची इच्छा आहे. प्रदेश काँग्रेसनेही त्याला दुजोरा दिला. पण आघाडी बाबत ठाणे महापालिकेची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते ठाण्याचे काँग्रेसचे निरीक्षक मुजफ्फर हुसेन यांनाच ही आघाडी नकोय. नगरसेवक नारायण पवार आणि उर्वरित गटाचा मात्र त्यांच्यासोबत मतभेद आहेत. आघाडी करायची की नाही, हे ठरवण्यासाठी झालेल्या बैठकीतच या दोन्ही नेत्यांमधले मतभेद उफाळून आले. आणि आघाडीवरुन काँग्रेसमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

close