कार्यकर्त्यांची कमाल, कलमाडींना केलं उद्घाटनाला उपस्थित

January 3, 2012 5:02 PM0 commentsViews: 2

03 जानेवारी

'पुणे तिथे काय उणे' पुण्याच्या बाबतीच असं म्हटलं जातं आणि ते या ना त्या प्रकरणामुळे आणखी उजेडात येतं. आज जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या त्याच बरोबर आजच आचारसंहिता लागू झाली. तर दुसरीकडे राजकीय पक्षांनी निवडणुका तोंडावर लक्षात घेऊन उद्घाटनाचा सपाटा लावला. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात एका उड्डाणपुलाचं उद्घाटन केलं. आणि विशेष म्हणजे या उद्घाटनाच्या समारंभाला कार्यकर्त्यांनी तिहार जेलमध्ये हवा खाणारे सुरेश कलमाडी यांना उपस्थित केलं. या अगोदरही असे अनेक प्रकार घडले माध्यमांनीही वेळोवेळी हा प्रकार जनतेच्या नजरेत आणून दिला पण ते कार्यकर्त्येच काय जे कुणाचं ऐकणार. चक्क सुरेश कलमाडी यांना तिहार जेलमधून सन्मानिय उपस्थितींच्या पंगतीत बसवले.

तर दुसरीकडे विरोधी पक्ष भाजपने ही कमालच करुन दाखवली पेशवे पार्कमधल्या फुलराणीचं उद्घाटन आज भाजपचे आमदार गिरीष बापट यांच्या हस्ते झालं. पण फुलराणीचं काम अर्धवट असताना त्याचं उद्घाटन करण्याची घाई का केली, असा प्रश्न विचारला जातोय. येत्या आठवडाभरात फुलराणीची सगळी कामं पुर्ण करणार आहे असं आश्वासनही भाजपचे आमदार गिरीष बापट यांंनी दिलं पण उद्घाटनानंतर पुन्हा दुरुस्त्या करायच्या होत्या तर उद्घाटन आता का केलं असा प्रश्न नागरिक विचार आहे.

close