मध्यप्रदेश निवडणुकांसाठी कमलनाथ यांची मोर्चेबांधणी

November 20, 2008 9:12 AM0 commentsViews: 5

20 नोव्हेंबर, मध्य प्रदेशपल्लवी घोष भारताचं वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये प्रतिनिधित्व करण्यापासून ते मध्यप्रदेशमध्ये पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून स्वत:ला प्रोजेक्ट करण्यापर्यंत कमलनाथ एकही संधी सोडत नाहीत. वाटाघाटी करण्याच्या त्यांच्या कौशल्याबद्दल ते ओळखले जातात. जागतिक परिषदांमध्ये त्यांचं ते कौशल्य दिसूनही आलंय.पण यावेळी मात्र कमलनाथ यांच्यापुढे पार्टीतली अंतर्गत भांडणं, आदिवासींचं काँग्रेसपासून दूर जाणं आणि बसपा अशी आव्हानं आहेत.नेहमीच्या मीटिंगपेक्षा आता कमलनाथ मध्यप्रदेश निवडणुकीमध्ये वाटाघाटी करण्यात गुंतलेयत.त्यांना मुख्यमंत्री व्हायचयं आणि त्यासाठी पक्षात त्यांच्या वाटाघाटी सुरू आहेत. काँग्रेसमध्ये स्वत:ची महत्वाकांक्षा जाहीररित्या बोलून दाखवण्यानं अनेकांच्या भुवया उंचावू शकतात, हे अतिशय मुरब्बी कमलनाथांना चांगलचं माहीत आहे. त्यामुळेच कोणतीही जाहीर विधानं करण्याचं ते टाळत आहेत.कमलनाथ हे महाकोसल क्षेत्रातल्या 57 विधानसभा जागांचे सम्राट आहेत. 2003 मध्ये काँग्रेसला इथे पराभवाचा सामना करावा लागला होता. कमलनाथ यांनी या भागावर आपलं लक्ष केंद्रीत केलंय. रोज कमीत कमी 6 रॅलीज तरी ते काढतात. आपल्या 68 लोकांना तिकीट्स मिळतील याची काळजी कमलनाथांनी घेतलीय. जर काँग्रेस जिकंली आणि कमलनाथांचे उमेदवार आले तर कमलनाथ खरचं किंग होऊ शकतात.कमलनाथ यांच्यासाठी एक महत्वाची गोष्ट म्हणजे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांनी कमलनाथ यांना पाठिंबा द्यायचं ठरवलंय. जी-20 परिषदेसाठी कमलनाथ पंतप्रधानांसोबत वॉशिंग्टनला जाणार नाहियेत. कारण त्यांना माहित आहे की 2009 मध्ये युपीएच्या विजयाची खात्री नाही.पण मुख्यमंत्री म्हणून 5 वर्षांसाठी त्यांचं भविष्य सुरक्षित आहे… कॉरपोरेट जग काय वाट बघू शकतं !

close