ममता आणि काँग्रेसमध्ये पुन्हा तू-तू मैं-मैं

January 3, 2012 5:55 PM0 commentsViews: 2

03 जानेवारी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि काँग्रेसमधील संबंध आज आणखी ताणले गेले. बंगालमध्ये काँग्रेस डाव्यांची साथ देत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. कोलकातामधल्या इंदिरा भवनचं नामकरण प्रसिद्ध कवी नझरुल भवन असं करण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाविरोधात युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेध मोर्चा काढला होता. त्यानंतर ममता बॅनजीर्ंनी हे वक्तव्य केलं. पण काँग्रेस आणि तृणमूलमध्ये काही वैचारिक मतभेद आहेत. मात्र वाद नाहीत, असं काँग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारींनी स्पष्ट केलंय.

close