राष्ट्रवादीने केला पिंपरी चिंचवडचा जाहीरनामा प्रसिध्द

January 3, 2012 10:45 AM0 commentsViews: 7

03 जानेवारी

राष्ट्रवादी काँग्रेसचा पिंपरी चिंचवडचा जाहीरनामा अजित पवारा यांनी प्रसिध्द केला. शहरात भरघोस विकास केल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. राज्यात सर्वात चांगलं काम पिंपरी-चिंचवड महापालिकेनं केलं आहे. तिथं अनेक कामं सरकारने तडीला नेली आहेत. पर्यावरण निकष पाळून शहराचा विकास केला आहे. राज्यात सर्वात जास्त पाणीपुरवठा करणारी पिंपरी चिंचवड ही पालिका आहे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. 24 तास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आलं आहे. 386 कोटी रुपये पाणीपुरवठ्यावर खर्च झाल्याचं त्यात म्हटलंय.

close