अनुजचं पार्थिव घेण्यासाठी कुटुंबीय लंडनसाठी रवाना

January 4, 2012 9:28 AM0 commentsViews: 2

04 जानेवारी

मँचेरस्टरमध्ये हत्या करण्यात आलेल्या अनुजचं पार्थिव शुक्रवारी भारतात आणण्यात येणार आहे. अनुजचे आई-वडील आज लंडनला रवाना झाले आहे. अनुजच्या पार्थिवावर काल दुसर्‍यांदा पोस्टमॉर्टम करण्यात आलं. त्यानंतर त्याचं पार्थिव भारतीय हाय कमिशनकडे सुपूर्द करण्यात आलंय. उद्या किंवा परवा, प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अनुजचं पाथिर्व त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात येणार आहे. दरम्यान, अनुजच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कायरन स्टेपलटन नावाच्या तरुणाला 20 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय. दरम्यान मँचेस्टर पोलिसांनी काल पुन्हा एकदा अनुजच्या आईवडिलांची पुण्यात भेट घेतली. अनुजच्या हत्या प्रकरणातल्या दोषींना वाचवण्याचा प्रयत्न केला जाणार नाही, असं आश्‍वासन त्यांनी अनुजच्या कुटुंबीयांना दिलं.

close