‘आदर्श’बाबत विलासरावांना अंधारातच ठेवलं – तिवारी

January 4, 2012 9:37 AM0 commentsViews: 5

04 जानेवारी

आदर्श घोटाळ्या प्रकरणी आयोगासमोर साक्ष देताना निलंबित राज्य माहिती आयुक्त रामानंद तिवारी यांनी खळबळजनक खुलासा केला. कॅप्टन प्रकाश पेठे मार्गाच्या रुंदीमध्ये कपात करुन ती जमीन सोसायटीला देण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना अंधारातच ठेवण्यात आलं होतं, त्यांनी याबाबबत काहीही माहिती नव्हती अशी कबुली तिवारी यांनी दिली. आदर्शच्या गैरव्यवहाराबाबतची सुनावणी आयोगापुढे सुरू आहे. सुरुवातीला पेठे मार्गाची रूंदी 60.97 मीटर होती पण राज्य सरकारने एका आदेशाद्वारे 2002 मध्ये ही रुंदी कमा करून 18.40 केली. ही माहिती आपण मुख्यमंत्र्यांना दिली नाही असं तिवारींनी सांगितले आहे. त्यामुळे यासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना अंधारात ठेवण्यात आलं होतं का,असाच प्रश्न आता निर्माण होतो.

close