पेड न्यूज प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

January 3, 2012 7:32 AM0 commentsViews: 5

03 जानेवारी

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजकीय भवितव्यसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पेड न्यूज प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. अशोक चव्हाण यांना गेल्या सुनावणीच्यावेळी सुप्रीम कोर्टाने आपलं म्हणणं मांडायला सांगितलं होतं. निवडणुकीचा खर्च मर्यादेपेक्षा जास्त झाल्यामुळे निवडून आलेल्या उमेदवाराला अपात्र ठरवण्याचा हक्क निवडणूक आयोगाला आहे. असं हायकोर्टाने याबद्दलच्या निकालात म्हटलं होतं. त्यावर चव्हाण यांच्याकडून आक्षेप घेण्यात आला होता. आणि त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. निवडणूक आयोगाने आपलं याबद्दलचं म्हणणं गेल्या वेळी सुप्रीम कोर्टात सादर केलं आहे. यावर अशोक चव्हाण यांचे वकील आज आपली बाजू मांडणार आहे.

close