नाशिकमध्ये भररस्त्यात तरुणीवर सामूहिक बलात्कार ; 6 जणांना अटक

January 4, 2012 10:34 AM0 commentsViews: 4

04 जानेवारी

नाशिक जिल्ह्यातील पंचवटी भागात भररस्त्यावर तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्याची खळबळजणक घटना घडली आहे. या प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली आहे. पंचवटी भागातून ही तरुणी तिच्या भावासोबत जात असताना रिक्षा आणि व्हॅनमधून आलेल्या काही तरुणांनी या मुलीच्या भावाला मारहाण करून तिला ओढून घेतलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणामुळे नाशिकमधल्या कायदा सुव्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. 15 दिवसांपूर्वी पंचवटीच्या हिरावाडीमध्ये एका अल्पवयीन मुलीला अशा प्रकारे रिक्षातून पळवून नेण्यात आलं होतं. आणि तिच्यावर बलात्कार होण्याची घटना घडली होती.

close