अण्णांना रविवारी डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

January 3, 2012 1:51 PM0 commentsViews: 3

03 जानेवारी

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती आज जरा नाजूक आहे. त्यामुळे त्यांना शुक्रवार ऐवजी रविवारी डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसात अण्णांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत होती. पण काल रात्री त्यांचा खोकला वाढला. त्यामुळे औषधं आणखी दोन दिवस वाढवावी लागतील, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. अण्णांना संपूर्ण विश्रांतीची गरज असल्याचं डॉक्टरांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. तसेच त्यांची तब्येत पूर्ण बरी झाल्यानंतरच त्यांच्याशी चर्चा करून कोअर कमिटीच्या बैठकीविषयी चर्चा केली जाईल असं केजरीवाल यांनी कालच स्पष्ट केलं.

close