सिडनी टेस्टवर ऑस्ट्रेलियाची 291 रन्सची भक्कम आघाडी

January 4, 2012 11:43 AM0 commentsViews: 2

04 जानेवारी

सिडनी टेस्टवर ऑस्ट्रेलियन टीमने आता मजबूत पकड बसवली आहेत. दुसर्‍या दिवशी भारतीय टीमला एकमेव विकेट मिळाली ती रिकी पाँटिंगची…त्याची सेंच्युरी झाल्यावर 134 रनवर ईशांतने त्याला आऊट केलं. तोपर्यंत मायकेल क्लार्कसोबत त्याने 288 रनची पार्टनरशिप केली होती. दोन वर्षातली पाँटिंगची ही पहिलीच सेंच्युरी. त्याचा साथीदार मायकेल क्लार्कने तर त्याच्याही पुढे जात नॉटआऊट डबल सेंच्युरी केली. दिवसअखेर 251 रनवर तो नॉटआऊट आहे. ऑस्ट्रेलियाने दुसर्‍या दिवसअखेर चार विकेटवर 484 रन केले आहे. आणि त्यांच्याकडे 291 रनची भक्कम आघाडी आहे. भारतीय बॉलर्सनी आज साफ निराशा केली.

close