‘नटसम्राट’ येणार आता मोठ्या पडद्यावर

January 4, 2012 12:18 PM0 commentsViews: 116

04 जानेवारी

कुसुमाग्रज लिखीत नटसम्राट या मराठीत गाजलेल्या नाटकावर सिनेमा बनणार आहे. नटसम्राट या नाटकावर सिनेमा येतोय अशी हवा बर्‍याच दिवसापासून होती. पण आज या सगळ्याचा उलगडा होणार आहे, कारण महेश मांजरेकर 'नटसम्राट' या नाटकारवर बेतलेल्या सिनेमाची आज पुण्यात अधिकृत घोषणा करणार आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन खुद्द महेश मांजरेकर करणार आहेत तर निर्मिती अनिरुध्द देशपांडे आणि महेश मांजरेकर यांची असेल. श्रीराम लागूंनी अजरामर केलेली आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका आता कोण साकारेल याची उत्सुकता आहे.

close