कुशवाह यांच्या प्रवेशाबद्दल संघानंही भाजपला फटकारलं

January 5, 2012 9:35 AM0 commentsViews: 3

05 जानेवारी

मायावतींनी हकालपट्टी केलेले उत्तर प्रदेशचे माजी मंत्री बाबू सिंह कुशवाह यांच्या भाजप प्रवेशावरून भाजपमधल्या अंतर्गत अडचणी थांबण्याची चिन्हं दिसतं नाही. एवढंच नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानही यावर नाराजी व्यक्त केली. संघाचं मुखपत्र असलेल्या पांचजन्यमधून संघाने कुशवाह यांच्या भाजप प्रवेशाबद्दल फटकारले आहे. अशा प्रकारच्या भ्रष्टाचारी नेत्यांना उत्तर प्रदेशच्या जनतेनं मतदान करू नये असं आवाहनही या मुखपत्रातून करण्यात आलं आहे. तर गोरखपूरचे भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांनीही बसपामधून हाकललेल्यांना भाजपने पक्षात जागा देऊन चूक केली असल्याची टीका केली. कुशवाह यांच्या भाजप प्रवेशाबद्दल अडवाणी यांनीही नाराजी व्यक्त केली होती. पण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि उत्तर प्रदेशातील पक्षाचे नेते राजनाथ सिंह आणि विनय कटियार यांनी या निर्णयाचं समर्थनं केलं होतं.

close