विरोधाकांची मतमोजणीची मागणी आयुक्तांनी फेटाळली

January 4, 2012 12:28 PM0 commentsViews: 6

04 जानेवारी

27 जिल्हा परिषद आणि 10 महापालिकांची मतमोजणी 17 फेब्रुवारीलांच व्हावी अशी सर्व विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली. मात्र ही मागणी आयोगाने फेटाळली. व्होटिंग मशीनची कमतरता असल्याने एकाच दिवशी मतमोजणी करणं अशक्य असल्याचे आयोगाने म्हटलं आहे. अतिरीक्त मशीनसाठा उपलब्ध झाला तरंच मागणीवर विचार करु असंही निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी स्पष्ट केलं.जि.प साठी 66 हजार तर महापालींसाठी 25 हजार मशीन लागणार आहेत अशी आयोगाची माहिती आहे.

close