गांगुली हेणार बीसीसीआयच्या तांत्रिक समितीचा सदस्य

November 20, 2008 10:29 AM0 commentsViews: 9

22 नोव्हेंबरआंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच रिटायमेंट घेतलेला सौरव गांगुली कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. पण यावेळी त्याची भूमिका वेगळी आहे. बीसीसीआयने आपल्या तांत्रिक समितीचं सदस्यत्व गांगुलीला देऊ केलंय. क्रिकेटशी संबंधित सगळ्या तांत्रिक बाजूंवर ही समिती लक्ष ठेवते. तसंच डोमेस्टिक क्रिकेट आणि देशात होणार्‍या आंतरराष्ट्रीय मॅचसाठी खेळाचे तांत्रिक नियमही ही समिती ठरवते. भारताचे माजी कॅप्टन सुनील गावसकर या समितीच्या अध्यक्षपदी आहेत. सध्याचे निवड समितीचे कॅप्टन कृष्णम्माचारी श्रीकांत आणि चेतन चौहान समितीचे इतर तीन सदस्य आहेत. देशातल्या क्रिकेट जडणघडणीत महत्त्वाची भूमिका ही समिती बजावते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा तगडा अनुभव असलेले खेळाडू या समितीत घेण्यात येतात.

close