आयबीएन लोकमत इम्पॅक्ट:जि.प.अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस

January 4, 2012 12:36 PM0 commentsViews: 2

04 जानेवारी

नांदेडमधल्या जिल्हा परिषद शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या पुस्तकांना वाळवी लागल्याची बातमी आयबीएन-लोकमतने दाखवली होती आणि या बातमीनंतर आता प्रशासन खडबडून जागं झालं आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा परिषदेचे सीइओ दिपेंद्रसिंह कुशवाह यांनी एक चौकशी समिती नेमली आहे. या प्रकरणात दोषी असणार्‍या गटशिक्षण अधिकार्‍यांसह इतर पाच अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावली गेली आहे. तुम्हाला निलंबित का करण्यात येऊ नये, असंही या नोटीशीत विचारण्यात आलं आहे. अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे जवळपास 40 लाखांपेक्षा जास्त किंमतीच्या पुस्तकांचे नुकसान झाले आहे. हा प्रकार हलगर्जीपणामुळे झाल्याचे दिपेंद्रसिंह कुशवाह यांनी दुजोरा दिला होता आणि गोदम सील करुन चौकशीचे आदेश दिले होते. आज कारणे दाखवा नोटीस बजावत निलंबित करण्याचा इशारा दिला आहे.

close