अनुजच्या पार्थिव उद्या कुटुंबीयाकडे सुपूर्द

January 5, 2012 9:57 AM0 commentsViews: 7

05 जानेवारी

अनुजचं पार्थिव घेण्यासाठी त्याचे कुटुंबीय लंडनला दाखल झाले आहे. आज त्यांनी ब्रिटिश संसदेला भेट दिली. भारतीय वंशाचे खासदार किथ वाझ यांनी या भेटीसाठी पुढाकार घेतला होता. अनुजच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देऊ असं आश्वासन यावेळी सर्वच खासदारांनी दिलं. तर परदेशातल्या विद्यार्थ्यांना आवश्यक सुरक्षा पुरवली जावी, असं आवाहन अनुजच्या आई-वडिलांनी केलं. यानंतर ते अनुजचं सामान घेण्यासाठी मँचेस्टरला रवाना झाले. उद्या संध्याकाळी त्यांना अनुजच्या पार्थिवाचा ताबा मिळणार आहे. त्यानंतर शनिवारी ते भारतात परततील.

close