युतीकडे आरपीआयची आणखी 5 जागांची मागणी

January 5, 2012 10:07 AM0 commentsViews: 5

05 जानेवारी

मुंबई महापालिका निवडणुकांच्या घोषणेनंतर महायुतीत हालचाली सुरू झाल्या आहेत. जागावाटपांचा निर्णय लवकर घ्या, असं सांगत महायुतीतला नवा भिडू आर.पी.आय. ने शिवसेना भाजपकडून अजून पाच जागांची मागणी केली आहे. या जागांवर या वार्डामध्ये दलित मतांची संख्या जात असून शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांचा गेल्या निवडणुकीत पराभव झाला होता. त्यामुळे अशा जागा देण्यात कोणतीच अडचण नाही अशी भूमिका आर.पी.आय. नं घेतलीय.

आर.पी.आयला अगोदरच 25 जागा याआधीच्या चर्चेदरम्यान सोडण्यात आल्या आहेत. आता अजून पाच जागांची मागणी आर.पी.आयने केल्यामुळे या जागा शिवसेना आणि भाजप यापैकी कोणाच्या कोट्यातून द्यायच्या याबद्दल स्पष्टता झालेली नाही. येत्या 11 जानेवारीला उध्दव ठाकरे, मंुडे आणि आठवले यांची एक अंतिम बैठक बांद्र्यातल्या रंगशारदा इथं होणार आहे. यात जागावाटपाचा अंतिम निर्णय जाहिर केला जाण्याची शक्यता आहे. पण त्या आगोदरच आर.पी.आयने आपली मागणी दबावतंत्राच्या माध्यमातून पुढे रेटण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

close