पुण्यात 8 माजी नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर

January 4, 2012 2:52 PM0 commentsViews:

04 जानेवारी

महापालिका निवडणुकीत काँग्रेसशी युती करणार नाही हे अजित पवारांनी स्पष्ट केल्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये त्यांनी काँग्रेसला धक्का दिला आहे. काँग्रेसचे 8 आजी माजी नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. काँग्रेसचे अमर मूलचंदानी, शशीकिरण गवळी, संतोष बारणे, यशवंत भोसले, मच्छिंद्र तापकीर हे आजी नगरसेवक तर नारायण बहिरवडे आणि हरीश बोधानी हे माजी नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला हा धक्का मानला जात आहे.

close